STORYMIRROR

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Fantasy

3  

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Fantasy

उषःकाल झाला

उषःकाल झाला

1 min
11.9K

रातराणी मिटले डोळे,

शुभ्र चांदणे फिक्कट झाले

मावळतीला चंद्र उतरला,

उष:काल झाला!


केशर बागा दहा दिशांनी

जणू बहरल्या रवी किरणांनी

आता तमाची तमा न उरली

अरूणाने धरतीस घातली

किरण शलाकांची माला (१)


वेलीवरती उमलल्या कळ्या

फुले होऊनी हसू लागल्या

फुलाभोवती फुलपाखरे

रुंजी घालत करिती नखरे

क्षणापूर्वीचा रंग नभाचा

किती भराभर पालटला (२)


कमळफुले की त्या नवयुवती

स्फटिक शुभ्रशा जली उतरती

त्या न पाकळ्या वस्त्रे फिटली

उघडेपण ना तनु विसरली

तशात चुंबन घ्यावयास तो

भ्रमर सरसावला (३)


दृश्य मनोहर दिसते अवचित

निशावतीचे जणू हे संचित

स्वप्न तियेचे सत्य जाहले

सुंदर जग ना तिने पाहिले

सृष्टीचा कण कण मोहरला (४)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy