उरल्यात फक्त आठवणी (चारोळ्या)
उरल्यात फक्त आठवणी (चारोळ्या)
1 min
780
उरल्यात फक्त आठवणी
१)
स्पर्श रांगडा तव हाताचा
ममतेने पाठीवर फिरला
उरल्यात फक्त आठवणी
मातृ स्पर्श अत्यल्प ठरला
२)
आयुष्याला घडवणारी
होती गुरुंची शिकवणी
काल प्रवाही दूर झालो
उरल्यात फक्त आठवणी
३)
उरल्यात फक्त आठवणी
तिच्या नि माझ्या प्रेमाच्या
उघड केले गुपित मनाचे
केल्यात गोष्टी संसाराच्या
