उगवला सूर्य आता पूर्वेला
उगवला सूर्य आता पूर्वेला
1 min
749
सांग तमाला
जा तू लयाला
उगवला सूर्य आता पूर्वेला
गेली संध्या,निशा,पहाट
पुन्हा उजळली सारी वाट
कालचक्र हे फिरते अविरत सरण्या याही युगाला
उगवला सूर्य अतां पूर्वेला
आता गूजन करतील पक्षी
नारायण तुज असेल साक्षी
देउनी अर्घ्या संकल्पावे ऐशा नवपर्वाला
उगवला सूर्य अतां पूर्वेला
झुळझुळ वाहे अवघी सरिता
मंद पवन हा नेई दुरिता
करुया वंदन प्रभातसमयी विश्वाच्या निर्मात्याला
उगवला सूर्य अतां पूर्वेला
