तू माझा श्वास आहे
तू माझा श्वास आहे


तू माझा श्वास आहे
तू माझा विश्वास आहे।
भिमा तुझ्यामुळे आम्हास मान आहे
तू होतास म्हणून स्वाभिमान टिकून आहे।
तू नाही कुणापुढे झुकला गेला
तू नाही कुणापुढे विकला गेला।
भिमा तुझ्या संविधानामुळे
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय,
हक्काची जाणीव झाली,
शिका, संघर्ष, संघटित व्हा!
हा मंत्र कानी दिला।
भिमा तुझ्यामुळे अस्तित्वाची जाणीव झाली।
तू होतास म्हणून आमची बलुतेगिरी संपली
आता आमची गाव-शहरात वट वाढली।
कवी मुरलीधर आपल्या मधुर वाणीत सांगतो,
तू माझा श्वास आहे, तू माझा विश्वास आहे।।