तू कोण
तू कोण
1 min
952
* तू कोण ?? *
अंगणातील कळी होतीस तू
मनामनातील मधुराणी होतीस तू
कुणाची छकुली कुणाची परी होती तू
खट्याळ अल्लड अवखळ
हास्याची परिसिमा होती तू
तू तूच होतीस साऱ्यांना हवीहवीशी तू
दिसामागुन दिस जाता
झाली कुलवधु तू
नववधु तुझ्या सख्याची
संसारात बहरली सासरची स्नुषा तू
मातृत्वाने पुर्णत्व मिळविलेस तू
चिमुकल्या पाखराची आस तू
असली की घरास घरपण आणणारी
नसली की सारं सुनंसुनं तुझ्याविना
अशी प्रत्येकाच्या मनामनातील ओढ तू...
नात्याचे वीण जपणारी ऊत्तुंग झेप तू..
