तू असा बरसून जा
तू असा बरसून जा


मळभले नभ, सुटला वारा, पावसा,
तू असा बरसून जा,
तुझ्या मनातले मजला सांग,थेंब थेंब नको, कोसळून जा,
तप्त झाली वसंधरा तिला,जाशील का शांत करून?
रिकामे झाले जे पाणवठे तेवाहतील का सारे भरभरून?
इंद्रधनुची कमान ताणून,नभी सप्तरंग तू उधळून जा,
वर्षाधारांचा स्पर्श करून,हिरवा रंग तू विखरून जा!
न्हाऊ घाल विषण्ण तनमन, चैतन्य रोमरोमी पसरून जा,
वाहून जातील व्यथा, वेदना,असे चिंब चिंब भिजवून जा!