STORYMIRROR

Sunita Ghule

Others

3  

Sunita Ghule

Others

तुटलेली पतंग

तुटलेली पतंग

1 min
385



गवसणी आकाशास

भव्य भरारीची आशा

दोर पतंगा रोखते

वाऱ्यावर भरवसा।


ध्येय जरी असे उच्च

जमिनीशी ठेव नाते

उरी जखम बोचरी

वादळात खाता गोते।


निळे तलम आभाळ

स्वप्न आयुष्यच रम्य

पतंगाची झेप जशी

इच्छा माणसा अदम्य।


गर्व यश,साफल्याचा

जसा भरारे पतंग

मंदिराच्या कळसाला

घंटा नादाचा तरंग।


साथ पतंग मांजाची

ग्वाही शाश्वत यशाची

दोर तुटता मधेच

दीन व्यथा पतंगाची।


तुटलेली पतंग ही

भक्तीविना जगणे रे

तुझ्या पतंगाची दोरी

भगवंता हाती दे रे।


Rate this content
Log in