तुटलेली पतंग
तुटलेली पतंग

1 min

353
हे जीवन, एक तुटलेली पतंग आहे
सुखदुःखाचे उठती सदा तरंग आहे ।।धृ।।
गगनात जेव्हा भरारी घेतो
दोरा कुणाच्या हाती असतो
बंधनांमुळे जीवनामध्ये आनंद आहे।।१।।
नेहमी कुणीतरी सांभाळतो
म्हणूनच स्वैरपणाने विहरतो
आपल्याच मस्तीत सदैव दंग आहे।।२।।
उंच उडतांना भान विसरतो
इतर जगाला तुच्छ ठरवतो
झेप ही अहंकाराची उत्तुंग आहे।।३।।
उंच उडतांना भान असावे
पाय आपुले भूवरी असावे
त्यातच खरोखर जीवन रंग आहे।।४।।
दोर तुटताच भरकटते जीवन
ठाऊक नाही अंतिम ठिकाण
दोर ज्याचे हाती त्याचाच संग आहे।।५।।