तुटका चष्मा...!
तुटका चष्मा...!
1 min
14.5K
तुटक्या चष्म्याचे जीवन आमचे
पिकली सारी पाने
पाखरं उडाली दाही दिशांना
निव्वळ उरले ओठी गाणे
आनंदाची नजर भिर भिरे
अथांग आकाशी
शोधू पाहती पाखरू आपले
धरण्या पुन्हा उराशी
विसरले घरटे आपले छान
विहारता मुक्त आकाशी
आम्ही इकडे मार्ग क्रमितो
गाठण्या ठिकाण काशी
हीच कथा अन व्यथा
घरो घरी दिसते आता
स्तित्यंतर पिढीचे होताना
पीळ काळजास पडे पैलतीर दिसताना
तुटला चष्म्या बरे वाटते
अंध डोळे असूनी झालो
वाट पाहुनी पाखरांची
अंतरीच आता शमलो
संध्या छाया बोलावते मज
कवेत चिरंतन घेण्याला
थांबलो क्षणभर जरासा
पाखरांचा निरोप घेण्याला.....!!!
