तुमच्यासाठी
तुमच्यासाठी


बांधव सुखात साजरी करती
दिन तो दिवाळीचा
तुम्ही डोळ्यात तेल घालुनी
रक्षण करता बांधवांचे सीमेवरी।।1।।
असो ऊन असो वारा
तमा त्याची कधीही नाही
झेलता सारीच संकटे
अपुल्या निधड्या छातीवरी।।2।।
तुमच्यामुळे पहुडतो
शांत रात्रीच्या निद्रेत
दिवाळीची लक्ष्मी येई घरात
ती पणती सदा तुमच्यासाठीही।।3।।