तुला माहित होतं ना सगळं?
तुला माहित होतं ना सगळं?
1 min
879
मी आतुर व्हायचे तुझं ऐकायला बोलणं
आणि तू हरवून जायचास गाणी ऐकण्यात
मी हळूच चोरट्या नजरेने तुझ्याकडे बघायचे
तू वाचत बसायचास काहीबाही वेगळं
तुला माहित होतं ना सगळं?
मी झुरायचे भेटीसाठी तुझ्या
तू फिरायचास स्वच्छंदी पक्ष्यासारखा सर्वत्र
मी रंगवायचे भविष्याची स्वप्नं तुझ्याबरोबर
तुझं स्वतःचंच जग होतं आगळं
तुला माहित होतं ना सगळं?
शल्य नाहीये की तुझं माझ्यावर प्रेम नव्हतं
व्यक्त तर मीच करु शकले नाही
दोघंही रममाण आहोत अापापल्या विश्वात
कधीतरी उसवतात आठवणींची ठिगळं
खरं सांग, तुला माहित होतं ना सगळं?
