तुझ्याचसाठी...
तुझ्याचसाठी...


तुझ्याचसाठी बनून येईन
पावसाच्या शुभ्र जलधारा..
नाचेन मुक्त मयूर होवून,
फुलवून प्रीतीचा मोरपिसारा...!
रिकाम्या मनात शिरुन तुझ्या
संपवेन एकटेपणा कोरडा
करेन वर्षाव रिमझिम प्रेमाचा,
होईल ऋतू हिरवा निसरडा...!
चष्म्यावरची काच बनून
डोळ्यासमोर राहीन तुझ्या
काळ्याकुट्ट अंधारातही राहशील,
ह्रदयात कायम माझ्या..!
अबोल माझी प्रीत एकली
साथ मला तू देशील.. ?
वाट पाहतो अजून तुझी,
खरंच कधी माझी होशील???