Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rakesh More

Others

4.0  

Rakesh More

Others

तुझ्या आठवणींना

तुझ्या आठवणींना

1 min
11.4K


तूझ्या आठवणींना एक नवी 

कहाणी देतोय मी 

उदास जीवनाला आठवणीच्या 

खाणी देतोय मी ||0||


खडबडून जाग्या झाल्यात 

का क्षणार्धात गत गोष्टी 

साथ देतेय त्यांच्या गतीला 

त्यांना समजून घेत सृष्टी 

तडफडणाऱ्या हृदयाला गोड 

गाणी देतोय मी 

उदास जीवनाला आठवणीच्या 

खाणी देतोय मी ||1||


काहीतरी कुठेतरी 

अधुरी एक कथा आहे 

भावनांची व्यथित करणारी 

अशीच एक व्यथा आहे 

मुक्या भावनांना एक मधूर 

वाणी देतोय मी 

उदास जीवनाला आठवणीच्या 

खाणी देतोय मी ||2||


सारं दुःख जगातलं 

कवडीमोल जाणवतं 

तूझी साथ असली तरच 

हे जगणं मानवतं 

विखूरलेल्या प्रीतीला एक नवी 

फुलदाणी देतोय मी 

उदास जीवनाला आठवणींच्या 

खाणी देतोय मी ||3||


Rate this content
Log in