STORYMIRROR

Balika Shinde

Others

4  

Balika Shinde

Others

तुझं माझं अलवार नातं

तुझं माझं अलवार नातं

1 min
40.9K


न कधी पाहिलेलं न कधी भेटलेलं तरीही जणू सात जन्माची ओळख असल्यासारखं वाटणारं..

तुझ माझं अलवार नातं....


तुझ्यात नी माझ्यात अंतर असुनही जवळ असल्याचे भास करून देणारं....

तुझं माझं अवलवार नातं...


न सांगता मनातलं ओळखणारं...

बोलता बोलता मी गप्प होताच काय झालं हे खोदून खोदून विचारणारं .....

तुझं माझं अलवार नातं.....


नाव काय नात्याला माहित नाही...

पण प्रेमाच्या पलिकडे ही जावून जपणारं ....

तुझं माझं अलवार नातं...


भावनेशी जोडलेलं मनाशी बिलगलेलं...

भरभरून मनमोकळं बोलावस वाटणारं ....

तुझं माझं अलवार नातं.. .


संकट रूपी प्रखर उन्हात सावली बनून सतत सोबत राहणारं...

माझ्या डोळ्यातल्या येणाऱ्या अश्रूंनी तुझी घालमेल वाढवणारं ..

तुझं माझं अलवार नातं...


क्षणाला क्षणाला आठवण करून देणारं....

कोणताही हक्क नसताना माझ्या ह्रदयावर राज्य करणारं ...

तुझं माझं अलवार नातं...


Rate this content
Log in