STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Romance Others

4  

Author Sangieta Devkar

Romance Others

तुझं असणं.!!

तुझं असणं.!!

1 min
265

तू शब्दांचे वार केलेस,मन घायाळ झाले.

हो चूक तर माझीच होती,मग का असे होते.

तू चिडलास बोललास खुप तूटत होते मी आतून,

वर वर रागवलास तू पण प्रेम,अधिकार होता मनातून.

नाहीच समजु शकले वेड्या तुला, ना समजले प्रेम तुझे,

ओठा वर नसले तरी मनातून कधीच जाणवले प्रेम तुझे.

का इतके प्रेम का इतकी ओढ़ का मनाला पड़ते तुझी भूल.

न बोलता खुप काही बोलतात डोळे तुझे, देतात तुझी चाहूल.

नको बोलू तू काही मी ही मौन राहते.

नाशिल्या डोळ्यात तुझ्या गुंतून पडते.

येतो मग जवळ तू आणि नजरेत बांधून ठेवतो.

विरघळून जाते मी क्षणात,राग ही तुझा मावळतो.

अस हे तुझ माज्यावर हक्क दाखवणं,सुखावून जात.

नाही समजत कसले कोणते हे जन्मोजन्मीचे नात.

पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडणं,तू माझा असणं.

सार सार काही हवंय मला,तुझं हसणं,तुझं रुसणं.

न बोलता मग मिठीत घेणं,हळूवार ओठांवर तुझं रेंगाळन...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance