तुझे गीत माझ्या ओठी
तुझे गीत माझ्या ओठी


स्वरात भिजते नयन माझे
कंठातील हुंकार स्वरलहरी व्हावे
सख्या हे गीत तुझ्यासाठीच मी गावे...
ओठी थांबलेले मनात दाटलेले रे
काव्य शब्दांचे, भाव मनाचे
कंठात माझ्या सूर रमलेले
दव जाणूनी तू टिपावे
सख्या हे गीत फक्त तुझ्यासाठी मी गावे...
हृदयी चढती रंग प्रीतीचा रे
स्वरांना स्पर्श गहिरा भावनांचा
ही वाट तुझ्यासवे चालताना
मज अंतरी निनाद हे राहावे
हे गीत फक्त तुझ्यासाठीच मी गावे...
तू ऐकावे... हारवावे...
सख्या, हे गीत तुझ्यासाठीच मी गावे...