तुच माझा श्वास
तुच माझा श्वास
नुसत्या तुझ्या आठवणीनं
निशिगंध बहरतो,
आणि फुलं वाचतांना मग
प्रियकर उगीचच का झुरतो ||
जिकंता जिंकता
हरुन गेलो मी,
वाट तुझी पाहून
रुसुन गेलो मी ||
हे गुलाबाच्या फुला
आठवण येते मला,
काय सांगू तुला
ईलाज नाही याला ||
रंग स्नेहाचा
वादळ उठते उरात,
तु भेटलीस की
आपण गाऊ सुरात ||
वाट पाहतो तुझी
आता एकच ध्यास,
विचार दुसरा नाही
आता तुच माझा श्वास ||