तु मला सोडून गेली असली.......!
तु मला सोडून गेली असली.......!


तू मला सोडून गेली असली
तुजा स्पर्श नाही गेला अजुन
तू माझ्या प्रेमाला गेली नजर लावून.....!
तुज्या आठवणी नाही गेल्या पुसून
एकटा बसलो प्यायला तू गेली
दुसऱ्याचा हात धरुन......!
मित्रासोबत रडलो तुझ्या
आठवणीत मन भरून.
तू गेली मला सोडून.....!
तुझं माझ्यावर खरं प्रेम असं दिलं दाखवून
मी अगदी मनापासून खरं प्रेम केलं.
डोळ्यातून अश्रू पटकन आलं भरून......!
तू असं करशील वाटल नव्हते
माझ्या मनाला विश्वास उडाला
आयुष्य
ात तु पहिल्यांदा धोका
दिला माझ्या खऱ्या प्रेमाला
आज ही तुला पाहिले की
वेदना होतात माझ्या
तुझ्यासोबत घालवलेल्या क्षणाला......!
तुझ्यासाठी पाहिली होती खूप मोठी स्वप्न
तू माझं करून टाकलं अवघड जगणं
विश्वास नव्हता माझ्यावर केला घात नाही मी तुझ्यावर
तू आघात केला माझ्या हृदयावर......!
शेवटी तुला भेटायचं होतं तूच नाही आली
मला तुला बोलायची मनातून इच्छाचं नाहीं उरली...!
तू मला सोडून गेली असली तरी
तुजा स्पर्श नाही गेला अजुन
तू माझ्या मनात असणाऱ्या खऱ्या प्रेमाला गेली फसवून.....!