ट्रॅफिकदादा
ट्रॅफिकदादा

1 min

10
ट्रॅफिकदादा राहतात
उभे उन्हात
त्यांची वाटे
भीती मनात
कोण तोडतो
सिग्नल बरे
बरोबर ते
ओळखतात खरे
हातवारे करून
दुखतात हात
सोडत नाहीत
शिट्टीची साथ
काम असते
अगदी चोख
बोलणं कसं
तर रोखठोक
कामाची ठेवतात
ते नोंदवही
नियम पाळायला
लावतात काही