टेलिफोन ते मोबाईल
टेलिफोन ते मोबाईल


ट्रिंग ट्रिंग ट्रिंग... घंटी वाजताच, आम्ही धावत होतो |
कोणाचा तो फोन असेल, असे विचार करीत होतो ||
ज्याला फारच गरज राही, तोच फोन करत होता |
जन्म, मृत्यू, लग्न, अपघात, अशाच बातम्या देत होता ||
फोन येताच सगळ्यांच्या, हृदयाचे ठोके वाढत होते |
कारण खुशीचे कमी तर, दुःखाचेच जास्त फोन येत होते ||
त्यावेळी फार कमी लोकांकडे, टेलिफोन राहत होता |
आपल्यासोबत इतरांच्याही, उपयोगी पडत होता ||
त्यावेळी टेलिफोनचा, सन्मान होत होता |
ज्याच्या कडे तो राही, त्याचाही मान होत होता ||
त्याची जागा मोबाईलने घेऊन, प्रगती केली आहे |
फोनची गरज कमी करून, स्वतःची महिमा दाखवली आहे ||
मोबाईल हा जवळच राही, त्याची मोठी वाहवाही |
कोणाशीही बोला तुम्ही, केव्हा आणि कधीही ||
बोलणे ऐकणे सोपे झाले, नाते जवळ आले|
सकाळपासून रात्रीपर्यंत, लोकं बोलतच राहीले ||
मोबाईलने रेडीओ, टार्च, कॅल्युलेटर चे काम केले |
फोटो, व्हिडिओ काढून, कॅमेरालाही मागे सारले ||
व्हाॅट्सअप, फेसबुक च्या मार्गानं, मिडियाचे कामं करतो |
आॅनलाईन कामामुळे, बँक, रेल्वे ची गर्दी कमी करतो ||
असा आहे हा मोबाईल, सर्वांचे सर्वच कामे करतो |
म्हणूनच तर आज तो खुशीने, सर्वांच्या खिशात राहतो ||