STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

टेडी डे...!

टेडी डे...!

1 min
608


आज टेडी डे म्हणजे क्षणभर

बाल पण अनुभवण्याचा दिवस

लहान मुलांसारखं बागडण्याचा

अन आनंद लुटण्याचा दिवस


प्रतिकात्मक खेळणं भेट करायचं

आणि दुसऱ्याच्या आनंदात न्हायच

देण्यातल सुख अनुभवायचं

आणि खऱ्या आनंदात डुंबायच


विचार साधाच पण जवळ आणणारा

आणि दरी विचारांची घालवणारा

समाज जीवन जणू छोट्या छोट्या

साध्या गोष्टीतून शिकवणारा


आज टेडी डे पण साजरा करूया

आनंद मैत्रीचा खरा लुटुया

मौज मजा थोडी करूया

मैत्रीचे वस्त्र घट्ट विणूया....!!!!








Rate this content
Log in