तोल...!
तोल...!
1 min
13.5K
तोल राखते मी जीवनाचा
रिकाम्या पोटी राहून
चूल पेटविण्या
चालले लाकूड घेऊन
पोट टेकले पाठीला
जड झाले ओझे डोक्याला
त्रास होतो उन्हाच्या वक्ताला
पहाटे उठते पाचाच्या ठोक्याला
माय निघून गेली देवाघरी
नाही कोणी मज शेजारी
परिस्थिती ही बेजारी
लेकरू पोटाशी आजारी
तरीही मी वाट तुडविते
अनवाणी पैंजण तालात
अश्रू अटवीत डोळ्यात
हसू ठेवुनी सदा गालात
नजर माझी हेच पाहते
उद्याचे मी भविष्य रेखीते
उन्हाला या बाय बाय म्हणते
तोल सावरत घर आले म्हणते....!
