Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Khedkar

Romance

3  

Neha Khedkar

Romance

तो, ती आणि पाऊस...

तो, ती आणि पाऊस...

1 min
123


दरवर्षी पाऊस येतो 

दरवर्षी असं होतं...(२)

त्याचं तिचं पावसावरून

भांडण नेहमीच होतं...


तिला आवडतो अमृततुल्य चहा  

त्याला असे कॉफीची ओढ

एकमेकांचे मन राखण्यात

असते दोघांच्या प्रेमाची जोड


तिला हवी असते बाईकची राईड

तो म्हणतो कारमधून बघू साईट

अशा या प्रेमाच्या गुंतागुंतीत 

होते मात्र दोघांची फाईट...


तिला हवं असतं पावसात भिजायला

त्याला मात्र हवं असतं चार भिंतीत बसून बघायला

तिला मनमुराद भिजताना बघून

त्याचं मन होतं घुटमळायला...


तिला आवडतो पाऊस शब्दातून वर्णन करायला

त्याला मात्र हवं गाण्यातून गुणगुणायला

कवितांच्या आज गझलांच्या मैफिलीत

दोघेही लागतात मनमुराद रमायला..!


अशा या बेधुंद पावसाच्या सरीत

नकळत जातो हातात हात 

सर्वांग बहरतो प्रीतीचा

त्या ओल्याचिंब पावसात...


Rate this content
Log in