तो अवलिया
तो अवलिया
1 min
11.9K
चेहऱ्यावर फासूनी रंग
लावुनी मोठे नाक
नाव घेताच येई हसू
असा अवलिया खास
गबाळ वेशभूषा रंगेबेरंगी रंगाची
अनेक नकला करून
तो सर्वांचे मन जिंकून घेई
असला दुःखी मनाने जरी
तरी तो सर्वाना हसवी
आपले दुःख विसरून
हसवून आनंद पसरवी
सर्कस शी चा प्राण तो
मुख्य किरदार तो
जोकर विदूषक नावाने
ओळखतो अवलिया तो
