तो अन् ती
तो अन् ती
1 min
131
तो म्हणतो
माझं काय चुकतं
खरंच मला
वेळ मिळत नाही
आणि ती म्हणते
माझ्या चुकांचं कारण
तुझ्याशिवाय मला
दुसरं काही सुचत नाही
तो म्हणतो
जरा धीर धर ना
राणी मी तर
तुझाच आहे
आणि ती म्हणते
माझ्या अधिरतेचं कारण
खरं सांगायचं तर
राजा तूच आहे
तो म्हणतो
कसं समजावू तुला आता
तुझ्याहूनी वेगळी का
माझी अवस्था
आणि ती म्हणते
तूच सांग काय करू
ही तर तुझ्याच
वेड्या मनाची व्यथा