तंत्रज्ञानाचे जाळे
तंत्रज्ञानाचे जाळे
1 min
11.1K
नव्या युगाच्या वाटेवरती
व्यापले विश्व ज्ञानयुगाने
तंत्रज्ञान बसले कळसावर
कैद करण्या जणमाणूस नजरेने
अशांत मन सतत मागावर
उमजेना त्याविना क्षणभर
सवय जडली अतिवापराने
सोडता सोडेना जिवा हेच खरं
शापित झाले जनजीवन
जाळे भयंकर तत्रंज्ञानाचे
संभाषण विसरले सारे
गेले दिवस गप्पागोष्टींचे
चला थोडा बदल करूया
गरजेपुरता उपयोग करूया
पुस्तकांशी मैत्री जोडूया
सखे सोबती गट्टी करूया
मनमोकळ्या संवादाचे मजे लुटुया
जीवन जगू हसूनखेळून
द्वेषाची कटुता टाळूया
मदतीचा हात मनोमनी
मन जपण्या पुढाकार घेऊया
***********************