तिमिर
तिमिर
1 min
302
अज्ञानाचा तिमिर जाळून
ज्ञान ओज प्रस्फुटित करावा
मानवाच्या मनामनात
मानवतेचा ओघ झरावा!
अंधश्रद्धेचा तिमिर झाडून
श्रद्धेचा मार्ग धरावा,
मानवाच्या मनामनात,
मानवतेचा ओघ झरावा!
षड्रिपूचा तिमिर आळून,
अहंकाराचा बंध गळावा,
मानवाच्या मनामनात,
मानवतेचा ओघ झरावा!
जातभेद तिमिर जाऊन,
सर्व धर्म समभाव व्हावा,
मानवाच्या मनामनात,
मानवतेचा ओघ झरावा!
पापांचे तिमिर नाशून,
पुण्यकाल उगवावा,
मानवाच्या मनामनात,
मानवतेचा ओघ झरावा!
