तिकडेच तुझी वाट लाव
तिकडेच तुझी वाट लाव


बरेच दिवस झाले कोरोना तुझे
किती घालशील घाव
कंटाळा आला तुझा आता
किती खाशील भाव
मुक्काम तुझा वाढल्याने
ओसाड पडले शहर, गाव
लाखभर जीव घेऊनसुद्धा
थांबत का नाही तुझी हाव
किती दिवस घरात बसु
घेऊन आमचा मुठीत जीव
विस्कटलेल्या आयुष्याची
पुन्हा कशी सांग बांधू नीव
गोरगरीब माझ्या जनतेचा
अन्नासाठी झुरतो जीव
मुलांच्या शाळाही बंद केल्या
पाहून तुझी येते किव
थांबव आता तुझे तू खेळणे
जीवघेणे सारेच डाव
आला होतास जिकडून जसा
तिकडेच तुझी वाट लाव