STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Others

5.0  

Sonali Butley-bansal

Others

ती...

ती...

1 min
2.6K


सुईच्या टोकाएवढ्या टिंबापासून ते स्त्रित्वाचा आजपर्यंतचा कसा जपलास तू , ते मिटल्या डोळ्यांसमोरून तरळून गेले आज .. .


तळहातावर मावलेल्या तुला पहाताच

पुन्हा ?या प्रश्नार्थक नजरांचा सामना करत

तुला घट्ट कवटाळून ठेवत छातीशी

दिली तुला उब जगण्याची !!!


तुझं एक एक पाउल पुढे पडताना ,

ती एक एक पाउल दूर होत गेली आपल्या स्वप्नांपासून ...

तु फक्त शिक अन मोठं हो

या एकाच वेडापाई ,

कणखरपणे परताउन लावल्या सर्व प्रश्नार्थक नजरा!!!


बाहेरचं कुठलच वादळ तुझ्यापर्यंत पोहचून दिलं नाही तीने कधीही ,

म्हणूनतर तुझी तूच उभी राहिलीस ताठपणे!!!


अजूनही खंबीरपणे उभी आहे ती अश्रूंना लपवूत,

तीच्या मनाची उभारी हाच आहे तुझ्या जगण्याचा खरा आधार !!!

तू चार भिंतीच्या बाहेर जगावस ताठ मानेनं

म्हणून नाही ओलांडला उंबरा तीने कधी ...


तुझ्यामागचा पसारा आवरत आवरत ,

तुझ्यापुढे उभारले तीने चांदण्यांभरले आभाळ !!!

तुझी भरारी चांदण्यांपर्यंत जाण्यासाठी तीने रोवले आपले पाय घट्ट जमीनीवर ...


तुझ्याभोवती निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली तीनेच निग्रहाने !!!

म्हणूनच तू पोहचलीस इथवर सहजतेने ...


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Sonali Butley-bansal