"ती "
"ती "
आदी तू अनंत तू
आरंभ तू सृष्टीची सृजन तू
नऊ मासी उदरी
मासगोळा आकार देती
मातृसागर तू
प्रकृती तू ,कालचक्र तू
समय तू , ब्रह्मांड तू
प्रेम तू माया तू
तूच मोहिनी , काली तू
तू दुर्गा तू सरस्वती ,
अस्तित्व जगण्या
स्वाभिमान रक्षिणी तू
शक्ती तू अजिंक्य तू
आत्मविश्वासाची परिसीमा तू
मातृत्वाची महती तू
सृष्टीची ओळख तू
आदी अनादी काल तू
अंत तू , पूर्णचक्र तू
उमलत्या सुगंधी
श्वासाचा सूर तू
लय तू ताल तू
हृदयातल्या स्पंदनाचं
मधुर संगीत तू
निजत्या पापणीतल्या
निद्रेतला काळोख प्रकाश तू
चालत्या प्रत्येक पाऊलात तू
पाउलाच्या पडत्या तालात तू
अबोध निरागस प्रत्येक
चेहऱ्यावरचं सुंदर हसू तू
तूच कारण सृष्टी जगण्या
तूच कारण ओठी हसण्या
पूर्णही अपूर्ण एक तुझ्याचशिवाय
