ती आणि तो
ती आणि तो
ती आणि तो जणू ...
एकाच रथाची दोन चाके
एक निखळले तरी ...
दुसऱ्याचे अस्तित्व कुठे उरते ?
ती रुसते ,चिडते -रडते , भांडते
तो रागावतो , समजावतो , राग गिळतो
त्याला रडण्याची कुठे मुभा असते ?
तो जबाबदारीचा भार खांद्यावर वाहतो
तो आणि ती एक अतूट नातं ...
तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना
वादविवाद ,रुसवा अबोला नित्याचाच
पुन्हा नव्याने राजा राणीचा संसार ठरलेला
तो आणि ती घरास घरपण देतात
प्रेम , सहवास , त्याग समर्पण ...
दुःखात खंबीर साथीदार होतात
खडतर रस्ता सोबत करतात स्वखुशीने
तू - तू, मी - मी होता
बाळ चिमुकले हिरमुसते
ती अंगाई गाते तो मंत्रमुग्ध होतो
तिचे अनेक रूपे पाहून विरघळतो
तिचे आणि त्याचे नाते जन्मांतरीचे
तो होतो संरक्षक भिंत जबाबदारीची
ती घरात दिवा होऊन जळत राहते
घर साकारते मग लोभसवाणे हवे हवेसे ...
