STORYMIRROR

Raakesh More

Others

3  

Raakesh More

Others

तिच्याच मिठीत जगण्यासाठी

तिच्याच मिठीत जगण्यासाठी

1 min
11.3K

मोक्ष मुळीच नकोय मला 

प्रत्येक वेळी नवा जन्म हवा 

तिच्याच मिठीत जगण्यासाठी 

देत जा दरवेळी जन्म नवा ||0||


तिच्या सहवासासाठी मी 

जीवनातील दुःख कवटाळीन 

तूझ्या विश्वातील सर्व नियम 

नक्की काटेकोरपणे पाळीन 

आहेस जाणून तू माझ्या 

हृदयातील प्रेमाचा गोडवा 

तिच्याच मिठीत जगण्यासाठी 

देत जा दरवेळी जन्म नवा ||1||


प्रेमात वेदना बोथट होतात 

धार त्यांची झिजून जाते 

जखमेचा अग्नी भडकला तरी 

दाहकता ती विझून जाते 

सांग जगाला तिला माझ्या 

हृदयातील खरं प्रेम दाखवा 

तिच्याच मिठीत जगण्यासाठी 

देत जा दरवेळी जन्म नवा ||2||


वाट बघतो प्रत्येक जन्मी 

तिची मी हृदय सावरून 

येते ती नक्की शोधत मला 

अपरिचित नजरेने बावरून 

प्रत्येक जन्मी भावनांनो तिच्या 

हृदयी माझं प्रेम जागवा 

तिच्याच मिठीत जगण्यासाठी 

देत जा दरवेळी जन्म नवा ||3||


जन्ममरणाच्या फेऱ्यातून 

सुटका मुळीच नको मला 

तिच्यासाठी पुन्हा पुन्हा 

येईन मी या पृथ्वीतला 

अनुभव घेईन प्रत्येक जन्मी 

प्रेमाचा सुखद तिच्या गारवा 

तिच्याच मिठीत जगण्यासाठी 

देत जा दरवेळी जन्म नवा ||4||


Rate this content
Log in