STORYMIRROR

Yogita Takatrao

Others

4  

Yogita Takatrao

Others

तिचं आणि त्याचं पहिलं प्रेम

तिचं आणि त्याचं पहिलं प्रेम

1 min
16.2K



तिच्यासाठी तोच तर होता तिचं पहिलं प्रेम

तुझं माझं करता करता झालं होतं त्यांच प्रेम

कधी जुळली ती बघता बोलता त्याच्याशि संलग्न

रोजच्या गठिभेटि आणि झालं त्यांच लग्न


दोन वर्षें मजेत गेलि नव्हती कसली चिंता

तो कामात ती कामात मग वाढला हा गुंता

ना त्याला फुरसत ना तिला होती वेळ

जबाबदारींच्या ओझ्यांत निघुन गेला मेळ


मग एक दिवस दोघांच्या आलं मनात

किती लांब आहेत ते राहुन एकाच घरात

घरच्या गोंधळातही आलं होतं एकटेपण

दोघांच्याही मनात एक विषण्ण रितेपण


प्रेम गेले कोपऱ्यात त्याला आला संशय

तिच्याही प्रेमाचा मग संपला सगळा आशय

रोजची धुसफुस आदळ आणि आपट

रोजची तीचि चिडचिड आणि कटकट


दोघांनाही काय हवं आहे बोललेच नाही

आणि हया प्रश्नांची उत्तरेही मिळालीच नाही

त्याला वाटायचं तिने पहिलं यावं जवळ

तिलाही वाटायचं त्यानेच घ्यावं तिला जवळ


असं हे पहिलं प्रेम दूर दूर होत गेलं

नातंही मग त्यांच तूटत तूटत आलं

त्याने तर सरळ तिलाच ठरवल जबाबदार

तिही बोललि मग सोडुन जाईन घरदार


तो बोलला तुझ्याबरोबर नाही आली मजा

ती पण बोललि मीही भोगतेय त्याचिच सजा

कुठेतरी त्यांचि काळवेळ चूकत होती

दोघंही गुणी होते हो भेट होत नव्हती


त्यात त्यांचीच माणसे आगित तेल टाकत होती

लग्नाची गाठ आता घटस्फोटापर्यंत येत होती

दोघांचिही झोप उडाली काढला त्यानींच मार्ग

एकमेकांपाशिच तर होता त्यांचा सुंदर स्वर्ग


पक्क ठरवलं त्यांनी आता एकमेकांना वेळ देऊ

तिसऱ्या माणसाला आपल्यापासून लांब ठेऊ

कारण दोघंच तर होते एकमेकांचे पहिलं प्रेम

आजही करतात एकमेकांवर तेच पहिलं प्रेम


Rate this content
Log in