STORYMIRROR

Murari Deshpande

Others

3  

Murari Deshpande

Others

तिची आवड -त्याची आवड

तिची आवड -त्याची आवड

2 mins
13.5K


मी देशी खाद्य चाहाता

तू पिझ्झा बर्गर वाली 

हि अवघड मैत्री आता

भलती रे गोची झाली 

विश्वातील अन्नाला तू 

हरघडी मारते हाका 

पालथा घातला बघ तू

हर एक खवैय्या नाका 

तुज चिनी जपानी आवडे

मज महाराष्ट्राची थाळी 

शुभमंगल झाल्यानंतर 

नेमके काय मम भाळी 

चिकनचे धरुनी तुकडे 

चावते सराईत तुही 

अन नाजूक नाव तुझे गं 

बघ शोभत नाही जुही 

अंड्यांना गट्टम करणे 

मळ फक्त तुझ्या हाताचा 

मी समोर होतो थंड 

अडकतो घास भाताचा 

मी 'सात्विक'थाळी वाला 

तू सामीष मसाला उष्ण 

होणार कसे पोटाचे 

मज रात्रंदिन हा प्रश्न

मज तुझ्या 'आहारी'जाणे

दिसतेच कठीण बघ सध्या 

राखले दूरवर अजुनी 

मी मांस आणि त्या मद्या 

मी सदैव ऐकत असतो , 

भीमसेन ,लता अन आशा 

तोंडात तुझ्या वसतीला 

त्या 'हनी -सनी 'ची भाषा 

मी पूर्ण नेसतो वस्त्रे 

तुज त्याचाही तिटकारा 

फेकली कुठे तू सांग

का दिलास त्या फटकारा 

तू हवाहवाई बाई 

मी सरळ सभ्य माणूस 

जा तुझ्याच मार्गाने तू

मज जास्त नको ताणूस

या ओळखीसही आता 

देऊ या पूर्णविराम 

तू सुखी तुझ्या सदनी अन

मज गरजेचाच आराम !!!

मी देशी खाद्य चहाता 

तू पिझ्झा बर्गर वाली 

हि अवघड मैत्री आता

भलती रे गोची झाली 

विश्वातील अन्नाला तू 

हरघडी मारते हाका 

पालथा घातला बघ तू

हर एक खवैय्या नाका 

तुज चिनी जपानी आवडे

मज महाराष्ट्राची थाळी 

शुभमंगल झाल्यानंतर 

नेमके काय मम भाळी

चिकनचे धरुनी तुकडे 

चावते सराईत तुही 

अन नाजूक नाव तुझे गं 

बघ शोभत नाही जुही 

अंड्यांना गट्टम करणे 

मळ फक्त तुझ्या हाताचा 

मी समोर होतो थंड 

अडकतो घास भाताचा 

मी 'सात्विक'थाळी वाला 

तू सामीष मसाला उष्ण 

होणार कसे पोटाचे 

मज रात्रंदिन हा प्रश्न 

मज तुझ्या 'आहारी'जाणे

दिसतेच कठीण बघ सध्या 

राखले दूरवर अजुनी 

मी मांस आणि त्या मद्या 

मी सदैव ऐकत असतो , 

भीमसेन ,लता अन आशा 

तोंडात तुझ्या वसतीला 

त्या 'हनी -सनी 'ची भाषा 

मी पूर्ण नेसतो वस्त्रे 

तुज त्याचाही तिटकारा 

फेकली कुठे तू सांग

का दिलास त्या फटकारा 

तू हवाहवाई बाई 

मी सरळ सभ्य माणूस 

जा तुझ्याच मार्गाने तू

मज जास्त नको ताणूस 

या ओळखीसही आता 

देऊ या पूर्णविराम 

तू सुखी तुझ्या सदनी अन

मज गरजेचाच आराम !!!


Rate this content
Log in