STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

थोडी गम्मत ...!

थोडी गम्मत ...!

1 min
27K


थोडी गम्मत....!!

काय झालं एकदा

बायकोला आली लहर

तीन केला कहर...!!


चिठ्ठी लिहिली

मी जाते माहेरा

तुमचं काय ते तुम्ही बघा..!!


नवरा आला घरी

चिठ्ठी पाहून

खाली दोन शब्द लिहून गेला निघून..!!


दारा मागची बायको

घाय मोकलून रडली

स्थान नाही संसारात म्हणून वेडीपीसी झाली..!!


येता भानावर

चिठ्ठी टेबलावरची डोळे फाडून वाचली

आणि बायको खुदन हसली..!!


काय होत चठ्ठीत

तीन नाही सांगितलं पण जालीम औषध

रुसवा जाण्याचं तिला मिळालं...!!


बावळट पडद्या खालून

पाय तुझे दिसले

फोन बंद माझा तुला नाही कळले ...?


फोनवरच वाक्य एक

इतकंच कानी आलं होतं

डार्लिंग आज मी मुक्त झालो ये लवकर घरी..!!


चिठ्ठीतल वाक्य मात्र इतकं होत

चहा कर पटकन

खारी ,नान कटाई घेऊन येतो झटकन...!!


विश्वासाला कधी

पारखायच नसत

इतकं सोपं जीवन असतं...!!


प्रत्येकानं आमलात आणावं

सांगू पहातय साधं कवन

ते आता तरी जाणावं...!!


ती माझी मी तिचा

हेच सत्य या धरतीवरी

तेंव्हा कोठे भेटते

नो हरी, नो वरी आणि डोन्ट वरी....!!


Rate this content
Log in