"थेंबे थेंबे तळे साचले"
"थेंबे थेंबे तळे साचले"


थेंबे थेंबे तळे साचले.
तरंग उमटले तयावरी.
असंख्य त्याच्या जलधारा.
सजीवाला जीवदान करी. (१)
वाऱ्यावरती घेत लकीरी.
पाण्यावरती उठता लहरी.
त्या लहरींचे मंजुळ गीत.
जणू वाजवी कृष्ण बासरी. (२)
थेंब थेंब हा जपणे आहे.
जपून तो वापरणे आहे.
ऋतु बदलले कल बदलला.
निसर्ग लहरी झाला आहे. (३)
निसर्ग देतो दहा हातांनी.
कधी समृद्धी, प्रचंड हानी.
पाणी अडवा पाणी जिरवा.
मोल जलाचे घ्या समजुनी (४)
ओढे, नाले, तळी नि विहिरी.
नका बुजवू ते वैभव अपुले.
खेडी गेली झाली शहरे.
जुने स्रोत हे लोक विसरले (५)
आधीच साथीची आणीबाणी
त्यात नको रे पाणीबाणी.
ये ये पावसा तू वेळेवर.
तुला प्रार्थना ही निर्वाणी. (६)