Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

MAHENDRA SONEWANE

Romance

3  

MAHENDRA SONEWANE

Romance

तहानलेलं मन

तहानलेलं मन

1 min
11.9K


तुझ्या आठवणीत मला लिहावंसं वाटते

लिहायला बसलो की तूच समोर दिसते||


सर्व कामे सोडून मी तुझ्यात रमून जातो 

तुझाच विचार करत तुलाच बघत बसतो||


तू आणि मी नदीचे दोन किनारे 

आयुष्यभर सोबत राहूनही न भेटणारे||


संपत नाही दिवस रात्र तुझ्या आठवणीशिवाय 

तुझे रुसवे फुगवे आठवतात आजही तुझ्याशिवाय||


तू मला नकार देशील असं कधी झालं नाही 

माझं प्रेम तुझ्यासाठी अजिबात दुबळे नाही||


असं कसं प्रेम आहे न तहान आहे न भूक आहे 

फक्त तुला भेटण्यासाठी माझं मन व्याकुळ आहे||


वाटते तुझे भेटीचे क्षण कधीही संपू नये 

मनाला मोहून टाकणारे क्षण कधी दूर जाऊ नये||


अशाच घट्ट राहू देत तुझ्या प्रेमाच्या भेटी-गाठी 

आणि मी लिहितच राहिल फक्त फक्त तुझ्यासाठी||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance