तेरा जून
तेरा जून


पाचवा लॉकडाऊन
तेरावा दिवस पिरपीरणारा....!
ते रे मेरे सपने
रा त कली एक खाब में
वा दा तेरा वादा ऐकलं की
दि वस कसा छान जातो....
व सकन अंगावर येणार
स रळ डोक्यात शिरणार
पि ळवटून टाकणार संगीत
र टाळ काहीतरी नको वाटत....
पि चकारी लाळ गाळणारी
र स्त्यात दिसली की शिसारी वाटते
ना घर का ना घाट का अवस्था होते
रा म पारी सारी मजाच निघून जाते...!
 
;असच काहीतरी आज झालंय
रात्रभर पिरपिरिन नकोस केलंय
उजडताच त्यानं तोंड काळ केलंय
या हवेन आज जाम पीडलंय....
तरी पण सुप्रभात म्हणतो
तो येतो म्हणालाय
त्याच्यावर मी विश्वास ठेवलाय
कारण विश्वासावरच सारा
जीवनाचा डोलारा टिकलाय.....!