तेजोनिधी
तेजोनिधी
1 min
179
पटल तमाचे विरले
रश्मीकिरण उगवले
क्षितीवर लाली उधळे
नभोमंडल उजळले
अंधार विरुनी जाताच
आला नभांगणी भास्कर
वसुंधरा मनी हर्षित
स्वागता येतसे तत्पर
तम रजनीचा सारथी
किरण तेजस्वी मित्राचे
भार सृष्टीचा रविवरी
बळ प्रकाश अधिपतीचे
प्रकाशले अवघे विश्व
उजळे सोनकिरणांत
महाशक्तीशाली तेजस्वी
झळकतो रवि नभात
तेजोवलय किरणांचे
बलाढ्य अनाकलनीय
कोविडचा संहार करी
सर्व जगाला वंदनीय
