ते प्रेमच असते
ते प्रेमच असते
1 min
349
दिल्याने वाढते
घेतल्याने वाढते
वृध्दींगत होत जाते
ते प्रेमच असते
दुसऱ्याची काळजी
उगाचच वाटते
मनी घुटमळते
ते प्रेमच असते
रोमांच अंगावर
जेंव्हा ती दिसते
तृप्तता डोळ्यांची
ते प्रेमच असते
जीवापाड आवडे
हृदय ते धडधडते
मनी जे वसते
ते प्रेमच असते
