STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

तडफड...!

तडफड...!

1 min
24K


चारी बाजूनी उठले रान

सुन्न झाले आमचे कान

शरमेने झुकते मान

असली जरी गोष्ट सान

भ्रष्टाचाराची उबग महान


पैश्याची मोठी तहान

गावे कसे सत्याचे गान

उठले चोहो बाजूनी मतलबी रान

काँग्रेस बीज पसरले फार

राष्ट्रास वादी प्रतिवादी दोनचार

तेही पडले गप्प गार

बीजाचा मोठा मनास खार


सुपीकाचे झाले नापीक

नांगरटी करून पाहिले एकवार

तरी उगवे स्वार्थी बिंब मागे

पाहता पुढे आदर्श प्रतीवार

आपणच आपले कर्णधार

करू चला पुन्हा निर्धार


आता नको माघार

धरू सत्याचा आधार

असला जरी दुर्धर आजार

अन नापाक शेजार

करू साऱ्यांना बेजार

घालुनी देशभक्तीचा जागर पुन्हा एकवार....!!!


Rate this content
Log in