STORYMIRROR

Sunita Ghule

Others

3  

Sunita Ghule

Others

तडजोड

तडजोड

1 min
661


तडजोड



तडजोड क्षणोक्षणी

नियतीचा अनोखा खेळ

जगण्याच्या शर्यतीत

बदलत जाते वेळ।


कटु नावडत्या क्षणांना

आपसूक विसरून जावे

ती कातर काजळमाया

मनवांछित जगून घ्यावे।


आठवांचे उरल्यासुरल्या

हृदयकुपीत अत्तर व्हावे

अनुभव चिरंतन ठेव

संकल्पाला स्वरूप द्यावे।


तडजोड नाती जोडी

स्नेहभाव मनीचा दृढ

स्वार्थत्याग दैवी गुण

मानवतेची प्रतिमा रूढ।


समाधान दातृत्वाचे

अनमोल वसा स्विकृत

क्षण सोडून जाती सुखाचे

तसे दुःखही नाही शाश्वत।


Rate this content
Log in