स्वयंवर
स्वयंवर
सत्तासुंदरीची नशा अनेकांना करते वेडे
स्वप्नातही दिसतात फक्त गुलाल आणि पेढे
तिला मिठी मारायला सारेच असतात टपलेले
काय नेमके गुपित तिच्यात असते लपलेले?
गुडघ्याला बाशिंग बांधून वृध्दही तयार सजून
कोणाला वरमाला घालावी खुर्ची विचारते लाजून
वय आणि शिक्षणाची अट बिलकुल नसते
अंगठा छाप नवरदेवांचीही सध्या चलती दिसते
खतरनाक गुंड मवालीही स्वयंवरात भाग घेऊ लागले
सुंदरी म्हणाली मला तर कोणीही पळवून नेऊ लागले
यांची आशिकी नकोच बाई कुमारिका राहिलेलं बरं
हे केव्हाही पक्ष बदलतील यांचं काय खरं?
