स्वप्न
स्वप्न
1 min
29.1K
एक घर आपलंही असावं
नजरेच्या आड़ साऱ्या
ओंजळित धुके घ्यावे
मैफिलीत माझ्या ...
एक कुंपण आपलेही असावे
घरट्यास लागून साऱ्या
कोंदनी माहेर दिसावे मनोमनी तुझ्या ...
एक जाई आपलीही असावी
परस-अंगणी साऱ्या
शहारावी सांजकांन्ता मिठीत माझ्या ....
एक गोजिरे स्वप्न असावे
ह्रुदयी शिंपल्यात साऱ्या
अलबेल गोड व्हावी मृगनयनी तुझ्या ...
