स्वप्न साद
स्वप्न साद
स्वप्न स्वप्न म्हणते
साद मी घालते
माझ्या संगे नेते
इच्छा पूर्ण करते
स्वप्न स्वप्न म्हणते
कुण्या जनावराला चारा
कुण्या लेकराला माया
कुण्या झोळी ती रिकामी
हळूवार ती भरीतो
स्वप्न स्वप्न म्हणते
शेतातली ती पिके
कधी येतात तराया
कधी जातात तेही वाया
स्वप्न स्वप्न म्हणते
तुझं पाखरे पहाया
नेतो तुझीच दृष्टी
खूप छान आहे सृष्टी
स्वप्न स्वप्न म्हणते
गरीबाला घास देई
ती कालची ग आई
आणि आजही विठाई
स्वप्न स्वप्न म्हणते
कृष्णाची तीच राधा
मिरेला भूल घाली
की झाली कृष्ण बाधा
स्वप्न स्वप्न म्हणते
सगळ्यांची इच्छा माझी
पण माझी इच्छा काय
मी सांगत ही नसते
स्वप्न स्वप्न म्हणते
पहाट तीच झाली
स्वप्नांची तीच झोळी
मी घेऊन निघाली
मी घेऊन निघाली.........
स्वप्न स्वप्न म्हणते
ती स्वप्ने ते उराशी
आज भांधून निघाले
सगळे पूर्वीचे ते नाही
आता सगळे वेगळे
स्वप्न स्वप्न म्हणते
किती स्वप्ने ते उराशी
आज हितगुज घाले
धरतीच्या पोटी आले
सडा अंगणात पडे
स्वप्न स्वप्न म्हणते
किती स्वप्न ते उराशी
धरून शेतकरी चाले
त्याचे धान्य ते पेरता
कधी मोती त्याचे झाले
स्वप्न स्वप्न म्हणते
किती स्वप्ने ते उराशी
धरून दिस तो उगतो
कशी घालमेल होते
जसा दिस मावळतो
स्वप्न स्वप्न म्हणते
किती स्वप्ने ते उराशी
करू बहिणीचे लग्न
एका थोरल्या भावाला
आहे बापाचे कर्तव्य
स्वप्न स्वप्न म्हणते
किती स्वप्न ते उराशी
शिकू लेकाला मी कसा
माझ्या कामाचा मोबदला
मला देईल का खिसा
स्वप्न स्वप्न म्हणते
किती स्वप्न ते उराशी
नव वधू घरी येते
होते माहेर परके
आणि सासर परके
स्वप्न स्वप्न म्हणते
किती स्वप्ने ते उराशी
आता गरोदर माता
मला आता बाळ होणार
तिला किती हो ती आशा
स्वप्न स्वप्न म्हणते
किती स्वप्ने हो उराशी
बाळगून सारे चाले
याच स्वप्नाची दुनिया
सदा आपल्याच साठी चाले.......
सदा आपल्याच साठी चाले.......