स्वच्छ सोमवार...!
स्वच्छ सोमवार...!
1 min
13.6K
स्वच्छ सोमवार....!
स्वच्छ भारत म्हणत म्हणत
स्वच्छ सोमवार आला वाटत
जेंव्हा आभाळ फाटत आणि
लख्ख अवकाश प्रकाशत
सकाळ अशी आज उगवली
विना अडथळ्यांची शर्यत
रवी किरणांची इथवर
बिनबोभाट पार पडली
गारवाही जस जसा तो वर आला
तसा पाय लावून पळत सुटला
वाटले आज हा अवतार
कसला बरे सूर्य देवाने घेतला...?
तिरक्या नजरेने रोखून पाहिले
तसा मला म्हणाला
आता जरा तापायचे आहे मला
गारव्याचा मलाही त्रास काय सांगू तुला..!
