स्वातंत्र्यानंतरचा आजचा हिंदुस्थान
स्वातंत्र्यानंतरचा आजचा हिंदुस्थान


हा देश आहे त्या देशप्रेमींच्या बलिदानाचा
गर्व आहे आम्हाला आजच्या स्वतंत्र भारताचा
झाला सोहळा जुना परंतु साजरा करतो प्रत्येक वर्षाला
राजकारणाने आणि भ्रष्टाचाराने देश माझा बरबटलेला
७४ वर्षाचा विचार केल्यावर समजते कुठंपर्यंत आम्ही पोहचलो
जागतिकरणाच्या पसाऱ्यात माहित नाही आम्ही कुठे हरवलो
आजही विदेशी-स्वदेशीच्या गप्पात आम्ही रंगतो.
का कोण जाणे माहित नाही, विकासाच्या कल्पनाच आम्ही रंगवितो.
हजारो आंदोलने झाली शेतकऱ्याची विविध राज्याराज्यांत
परंतु नुसत्याच चर्चा आणि आश्वासनाची खैरात नेत्यांच्या भाषणांत
शिक्षणाचा तर बाजारच झालाय प्रत्येक क्षेत्रात
शाहू-फुलेंचा आदर्श घेऊनही व्यवसायिकता उपेक्षित राहिली आजच्या शिक्षणात
धर्मा-धर्माच्या नावावर तेढ निर्माण के
ले समाजात
बाबासाहेबांची घटना हि विसरलो आम्ही पुस्तकात
विविध पातळीवर युद्ध लढले गेले सीमेवर, दिसले मीडियावर त्याचे फलक
परंतु राजकारणाच्या गर्तेत कधीही दिसली नाही राजे शिवबांच्या तोडीची झलक
घराणेशाही, सत्तेचा बाजार आणि मोकाट सुटला भ्रष्टाचार
अंतर्गत घाणेरड्या आरोपाच्या राजकारणात स्वप्नाचा झाला चक्काचूर
नैसर्गिक संकटाने कंबरडे मोडले तर रोगराई, महामारी वाढली देशादेशात
आरोग्यसेवेचो प्राथमिकता कधीच दिसली नाही आपल्या अर्थसंकल्पात
स्वच्छतेच्या अभियानाच्या फोटोत दिसतात फक्त नेते आणि अभिनेते
पण खरेच कोणाच्या हातात, गाडगेमहाराजांचे झाडू कोठे दिसले होते ?
खरंच आशावादी बनून आत्मनिर्भर बनण्याची शपथ घेऊ स्वातंत्र्याची
गरज आहे एका प्रामाणिक, सामाजिक अशा मोठ्या क्रांतीची.