STORYMIRROR

Vikramsingh Chouhan

Others

4  

Vikramsingh Chouhan

Others

।। स्वामी ।।

।। स्वामी ।।

1 min
27K


देणार तूच घेणार तूच रे , तूच जगाचा स्वामी

मागुनी साथ , मिळुनी हाथ , काय देऊ तुला रे आम्ही

या भक्ती सुरांच्या , हाके मधुनी ,ऐक हाक आम्ही देऊ

साई राम साई श्याम सा ई साई राम साई श्याम ।।धृ।।

कोटी कोटी सुर्योतेजी रूप साईंचे झळकी रे

मिणमिणत्या या ज्योतीने अंधार मनाचे पळवी रे

हा दरवळणारा गंध फुलांचा चंदन होऊन जाई

हा खट्याळ वारा कपूरला असमानी रे नेई

या भक्ती सुरांच्या हाके मधुनी ऐक हाक आम्ही देऊ

साई राम साई श्याम सा ई साई राम साई श्याम।।१।।

आज इथे या गुरुस्थानी नाद घंटे चे निनादती

टाळ मृदंगाच्या नादी चिपळ्याना ही नाचवती

हे स्वप्नाचे कि सत्य म्हणावे साई हरवून जाई

या भक्तांच्या या हट्टा पायी रूप मानवी घेई

या भक्ती सुरांच्या हाके मधुनी ऐक हाक आम्ही देऊ

साई राम साई श्याम सा ई साई राम साई श्याम।।२।।

    ।।सद्गुरू साईनाथ महाराज कि जय।।


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍