STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

स्वागत...!!

स्वागत...!!

1 min
28.3K


चाहूल लागे मातेला

गोंजारी ती बाळाला

प्रसव वेदना असह्य जरी

सहन करून जन्म देते बाळाला


पोटचा गोळा बाहेर येता

मातृत्वाचा पान्हा फुटे

आसमंत सारे तिच्या

आनंदाला पडे थिटे


प्रत्येक माते पोटी

कान्हाच जन्मतो

ज्ञात आहे या जगती

भरतभूची हीच महती


लक्ष्मी सुद्धा इथेच

जन्मते घरोघरी

स्वर्गाहुनी पुनीत भूमी

ही आपली मातृभूमी


जन्म दिन हा इथला

प्रत्येक सुमंगल नक्कीच असतो

कृष्णाचा असो वा लक्ष्मीचा

म्हणुनी आनंदाने आम्ही साजरा करतो


सणावारांची रेलचेल इथे असते

ऋणानुबंध घट्ट बांधण्यासाठी

स्वधर्माची विजयी पताका

सदैव फडकते नावलौकिक टिकविण्यासाठी


जय श्रीहरी गोविंद गोपाळ

या हो या आता लवकर

पहा खोळंबळे सारे दारी

पाहण्या तुमचा श्रीकृष्ण अवतार


गोकुळाष्टमीचा मुहूर्त सुंदर

पतितपावन होतो आपल्या येण्याने

सौख्य समाधान शांती नांदते

दुःख दारिद्र्य जाताआपल्या पायगुणाणे


म्हणुनी म्हणतो आनंदाने

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी

येऊ द्यात आपली भूवरी स्वारी

हीच वेळ आहे योग्य खरी....!!!


Rate this content
Log in