STORYMIRROR

Sunita Ghule

Others

4  

Sunita Ghule

Others

स्वाभिमान

स्वाभिमान

1 min
532





स्वाभिमान


निर्माण केले स्वराज्य

जपला बाणा स्वाभिमानी

शिवबा आमचे राजे

आम्ही एकनिष्ठ,एक बाणी


सह्याद्रीची गिरी शिखरे

साक्षी पराक्रमाला

स्वाभिमान जपण्यासाठी

बाजी,तानाजी झुंजला।


स्वत्वहिनता नाही ठाऊक

राणी लक्ष्मी,अहिल्येला

रक्षण धर्माचे करण्याला

जिजाऊने शिवराय घडविला।


परस्त्री मातेसमान

तत्व राजांचे एक

आम्ही मानतो स्त्रीस

माता ,भगिनी वृत्ती नेक।


पुरोगामी महाराष्ट्राला

वारसा वीरपुत्रांचा

संत पंरपरेचा पगडा

ध्यास सहिष्णूतेचा।


राष्ट्रप्रेम सळाळते नसांत

अभिमानाने फुलते छाती

प्रियतम महान संस्कृती

तिलोत्तम भाळी माती।



Rate this content
Log in